मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला ISO-२०१५ मानांकन दर्जा प्राप्त…

मुर्तिजापूर – शहर प्रतिनिधी

स्थानिक शहर पोलीस स्टेशन हे इंग्रजांच्या काळापासून पोलीस स्टेशनची निर्मिती झाली आहे . संपूर्ण ग्रामीण भाग असलेला हा तालुका आणि दोन ते तीन जिल्ह्यांना लागून असलेल्या सीमा क्षेत्रफळाने खूप मोठा विस्तारलेला हा तालुका आणि या तालुक्याला पोलीस स्टेशनची जोडणे एवढे सोपे कार्य नव्हते. परंतु पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात होती .

अशा परिस्थितीत तालुक्यातील गाव खेड्यात बंदोबस्त आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे पाहिजे तेवढे सोपे नसताना मुर्तीजापुर पोलीस स्टेशन अनेक वर्षापासून आपली परंपरा सांभाळत आहे आज मितीस मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनला गेल्या ६ महिन्यापासून कार्यभार सांभाळणारे शिस्तप्रिय ,अभ्यासू तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेले ठाणेदार सचिन यादव यांची अशी शहरात ओळख आहे.

सर्वसामान्य माणसांना अगदी जवळ बोलावून प्रत्येक विषय समजावून घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांचे वाद आपसात मिटविण्याचा खूप मोठा प्रयत्न सचिन यादव हे कार्यरत झाल्यापासून करीत असतात. आपल्या कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांना सोबत सलोख्याचे, मैत्री् भावपूर्ण संबंध ठेवून त्यांच्यात शिस्त निर्माण करून त्यांना कर्तव्य तत्पर होण्यासाठी प्रयत्नरत असतात.

कमीत कमी रजा व जास्तीत जास्त वेळ आपल्या कार्यालयात घालवणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र या सोबतच आपण ज्या पोलीस स्टेशन मध्ये कार्यभार सांभाळत आहोत त्या पोलीस स्टेशनची वास्तूही लोकांसोबत बोलली पाहिजे स्वच्छ ,सुंदर दिसायला पाहिजे परिसर हा रमणीय व शोभनीय असावा म्हणून मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन चे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी खूप धडपड केली व आज मुर्तीजापुर पोलीस स्टेशनची वास्तू परिसर सौंदर्यपूर्ण रमणीय स्वच्छ व सुंदर दिसायला लागलेला आहे नागरिक आपली तक्रार घेऊन किंवा कैफियत घेऊन आल्यावर त्यांच्या मनात भीती निर्माण न होता याउलट प्रसन्नता मनाला लाभते

मुर्तीजापुर पोलीस स्टेशनच्या परिसरात फ्लेवर बॉक्स लावलेले संपूर्ण इमारतीचे सौंदर्य करण व सुशोभीकरण रंगरंगोटी ,हेड कॉन्स्टेबल यांना स्वतंत्र कक्ष व आसन व्यवस्था स्थापन केले आरो प्लांट पाण्याची व्यवस्था इलेक्ट्रिकल हॅन्ड सॅनिटायझर आधुनिक पद्धतीच्या सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या संपूर्ण इमारतीच्या समोरील भागात वॉल कंपाऊंड ची भिंत व गेट ही सर्व परिस्थिती बदललेली पहावयास मिळते .

मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनचे मुल्यांकन समीतीने मुल्यमापन केले.त्यात नुकताच १ मे रोजी ISO -2015 मानांकन प्रमाणपत्र जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर व पारिजात कंन्शलट्शी चे प्रो. प्रशांत सी.जोशी यांच्या हस्ते ठाणेदार यादव यांनी स्विकारले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here