मूर्तिजापूर | मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर यांचा कार अपघातात मृत्यू…

फोटो - सौजन्य सोशल मिडिया

मूर्तिजापूर – मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर यांचा आज कार अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत दुखःदायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून अनिल बेलाडकर हे मूर्तिजापूरकडे परत येत सोनोरी गावाजवळील अपघात झाल्याचे समजते. सदर घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर सर यांचे लहान बंधू अनिल बेलाडकर (मंडळ अधिकारी) हे बुधवारी दुपारी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय महामार्गाने आपल्या कार क्रमांक एमएच ३० एझेड २३९१ ने मूर्तिजापूरकडे परत येत होते, दरम्यान विरुद्ध दिशेने येत सरलेल्या अज्ञात जड वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

या धडकेत त्यांच्या छातीत मोठी दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत सुस्वभावी असणाऱ्या अधिकार्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here