मूर्तिजापूर | अट्टल बाईक चोराला ७२ तासाच्या आतच केले जेरबंद…शहर पोलिसांची कारवाई…

मूर्तिजापूर – शहरातील दुचाकी चोरट्याला मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवघ्या 72 तासाच्या आत केले जेरबंद केले आहे.दोन दिवसा अगोदर मूर्तिजापूर येथील रहिवासी यशवंत आळेकर ५२ गेट यांनी आपली दुचाकी चोली गेल्याची माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ला दिली असता.

एस डी पी ओ डॉ अर्जुन भोसले यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर शहर पोलिस निरीक्षक शेलेश शेळके यांचा मार्ग दर्शनाखाली मूर्तिजापूर शहर पो.कॉ.संजय वाघ, पो.कॉ.आकाश वाघमारे, पो.कॉ.सचिन घणबहदुर,

पो.कॉ. अमोल भांड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सलमान खान रहेमान खान वय २८ वर्ष रहिवासी मंगळवारा कारंजा लाड ह मु.नवीन घरकुल मूर्तिजापूर याने चोरून नेलेल्या दोन मोटारसायकल गाड्या जप्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here