मूर्तिजापूर | कोविड रुग्णांवर उपचार करुन त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम चावके यांना जामीन मंजूर…

मूर्तिजापूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व परवाना नसतानाही कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम चावके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दी. १८/२/२०२१ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास अकोला व मुंबई शासकीय पथकाने डॉ चावके यांच्या रुग्णालयास आकस्मिक भेट दिली असता यावेळी परवाना नसतानाही दोन कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

डॉ. पुरुषोत्त्म चावके हे BAMS डॉ. असून सुद्धा कोरोना काळात अगदी कोणालाही न घाबरता गेल्या वर्षापासून बिन्दास्तपणे कोरोना रुग्णांवर उपचार करीत होते. त्यांनी केळकर वाडी स्थित संतकृपा क्लिनिक बाल व जनरल केअर सेंटर सुरु केले. त्यांच्या विरुद्ध मागील वर्षी अनेक तक्रारी दाखल मिळाल्या होत्या.

डॉ. पुरूषोत्तम चावके यांच्या रुग्णालयास गुरुवारी अकोला व मुंबई शासकीय पथकाने आकस्मिक भेट दिली असता कोरोना रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करतांना आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ.सुरेश कराळे तालुका आरोग्य अधिकारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कुठलाही परवाना आढळला नाही.

दरम्यान डॉ.पुरूषोत्तम चावके यांच्याकडे कोरोना रुग्णांना भरती करवून त्यांच्यावर उपचार करण्याचा कुठलाही परवाना आढळला नाही. प्रशिक्षण व परवान्याअभावी कोरोना संसर्ग पसरण्याचा संभव असतांनाही आर्थिक फायद्यासाठी कोरोनारुग्णांना आंतररूग्ण म्हणून दाखल करवून घेतले.

या प्रकरणी डॉ.पुरुषोत्तम चावके यांच्याविरुद्ध भादंविच्या १८८, २६९, २७०,३३६, ४२० नुसार मुर्तिजापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व त्याच दिवशी त्यांना अटक केली.

डॉ. चावके यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देण्याकरिता त्यांनी त्यांचे वकील ॲड. सचिन वानखडे यांच्यामार्फत मूर्तिजापूर येथील फौजदारी न्यायालय समक्ष जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जास सरकारी वकिलांनी विरोध करीत म्हटले की सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीस जर जामिनावर सोडले तर तो अशाच प्रकारे गुन्हे करत राहील व राजकीय दबाव वापरून साक्षीदारांवर दबाव टाकणार.
त्याच प्रमाणे आरोपीचे वकील यांनी न्यायालयात सांगितले की आरोपीस सदर प्रकरणात खोटे फसवण्यात आले असून फसवणुकीचा गुन्हा आरोपीविरुद्ध प्रथम दर्शनी सिद्ध होऊ शकत नाही त्याकरिता आरोपीचे वकील यांनी विद्यमान न्यायालया मध्ये उच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडे सुद्धा दाखल केले व आरोपीचा जामीन मंजुर होनेस विनंती केली

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकुन आरोपी डॉ. पुरूषोत्तम चावके यांना सशर्त जामीन मंजूर केला
आरोपी डॉ. पुरूषोत्तम चावके यांच्या वतीने ॲड. सचिन वानखडे व ॲड. अटल यांनी युक्तिवाद केला.

1 COMMENT

  1. Some BAMS doctors always do malpractice in rural area
    They give Aborion pills without examination treat Dengue malaria and if complications occurs they send patients very late sometimes the patients loose their life’s

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here