मूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या !…तर मारेकरी दीपकराज डोंगरे यांचाही मृत्यू…

मूर्तिजापूर : मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूर येथे एका ३५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. धम्मपाल आटोटे असे युवकाचे नाव असून आज सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घटना घडली.

धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे यांचा जागेवरच मृत्यू झाला असून यात मृतकाचा भाऊ किरकोळ तर आरोपी गंभीर जखमी झाला. धम्मपाल उर्फ आदेश आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून परीचीत होता तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता, भाच्याच्या लग्नासाठी २९ जून रोजी गावी आला होता, आरोपी दिपकराज डोंगरे (५५) राहणार प्रतिक नगर मूर्तिजापुर हा २९ तारखे पासून धम्मपाल याच्या मागावर होता.

परंतु ३० जून रोजी दिपकराज डोंगरे याने धम्मपाल याला घरीच समशेरपूर येथे गाठून त्या पोटात चाकूने व कोयत्याने वार केले. त्यात धम्मपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचा मोठा भाऊ मधात सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने तो जखमी झाला. तर आरोपी दिपकराज डोंगरे हा गंभीररीत्या जखमी झाला असून पुढील उपचारासाठी अकोला येथे नेले असता रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचाही मृत्यू झाला.

आरोपी दिपकराज डोंगरे हे केंद्र प्रमुख असून अॅक्शन फोर्स शिक्षक संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा अध्यक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here