मूर्तिजापूर | खराब रस्त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात…दोन युवक गंभीर…

नरेंद्र खवले ,मूर्तिजापूर

मूर्तिजापूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ६ वर अमरावती वरून मूर्तिजापूर कडे येत असताना मूर्तिजापूर नजीक बुलढाणा अर्बन वेअर हाऊस नजीक खराब रस्त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला असून या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहे.

एम एच 27 ए जी 94 28 क्रमाकाच्या एक्टिवा गाडी ने प्रवास करीत असलेले सय्यद अश्फाक वय २८ राहणार सिरसो व सय्यद अमीर वय २२ राहणार अमरावती रहिवासी यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व ते रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.

या घटनेची माहिती मिळताच एका प्रवाशांनी वंदे मातरम आपात्कालीन टीम ला फोन करून घटनास्थळी बोलावले असता या दोघांना हि लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले त्यातील सय्यद अश्फाक वय २८ राहणार सिरसो हा गंभीर जखमी असल्याकारणाने त्याला अकोला रेफर करण्यात आले आहे ही घटना दुपारी 4 वाजून 30 मिनिटांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here