मूर्तिजापूर | भरधाव कारने ३५ वर्षीय महिलेला उडविले…महिला जागेवरच ठार

नरेंद्र खवले

मूर्तिजापूर ते अकोला महामार्गावर काटेपूर्णा जवळ दोन वाजताच्या दरम्यान रस्ताने जात असलेल्या ३५ वर्षीय महिलेला भरधाव कारने उडविले असून यात महिला जागेवरच ठार झाली आहे. फुलमा मोहोड असे मृतक महिलेचे नाव ती कुरणखेड येथील रहिवाशी असल्याचे समजते.

अकोल्याहून मुर्तीजापुर कडे एम एच 12 जेसी 61 57 क्रमांकाची चार चाकी गाडी भरधाव वेगाने येत असताना काटेपूर्णा पुलाजवळ काटेपूर्णा येथील रहिवासी पुलमा ताई राहुल वानखडे वय 35 राहणार काटेपूर्णा या रस्ता ओलांडून जात असताना या गाडीने त्यांना धडक दिली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

धडक एवढी भरधाव होती की गाडीने चार ते पाच वेळा पलटी झाली. त्यातील प्रवासी हे जागेवरून पळून गेले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दोन वाजताच्या दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली ही माहीती वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या टीम ला माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेस मूर्तिजापूर शवविच्छेदन करता पाठविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here