मूर्तिजापूर | समशेरपूर दुहेरी हत्याकांडातील ४ आरोपींना अटक…

मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या समशेरपूर या गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील ४ आरोपींना ग्रामीण पोलीसांनी आज १ जुलै रोजी अटक केली. सदर हत्याकांड ३० जून रोजी तालुक्यातील समशेरपूर येथे सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडले.

मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथे एका ३५ वर्षीय युवक धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढताना मारेकरी दिपकराज सहदेव डोंगरे (५३) राहणार प्रतिक नगर मूर्तिजापुर चिडलेल्या गावकऱ्यांनी याला लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली,

यात दिपकराज हा गंभीररीत्या जखमी झाला होता त्या उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. उपचारार्थ अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. धम्माल याचा मारेकरी असलेला दिपकराज मरण पावला.

परंतु दिपकराज याचे मारेकऱ्याचा शोध घेत पोलीसांनी १ जुलै रोजी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली. सदर हत्याकांड हे प्रेम प्रकरणातून घडले असल्याचे मृतक धम्मपाल याचा भाऊ विनोद आटोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्या उलट मृतक दिपकराज डोंगरे याच्या मुलीची फिर्याद पोलीसांनी ३० जून रोजी पोलीसांनी नोंदवून घेतली,

मृतक धम्मपाल याने तुमच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे असे म्हटले, त्यावर दिपकराज याने तु माझ्या मुलीला त्रास का देतो, तुझे लग्न झालेले आहे, तिचा नाद सोडून दे, असे म्हटले असता धम्मपाल याने जमाव करुन माझ्या वडिलांना विनोद आटोटे, महादेव आटोटे, इंदुबाई आटोटे, आणखी ८ ते १० जणांनी लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संतोष नागोराव आटोटे (४५), प्रभाकर जानराव आटोटे (३०), विजय लाला आटोटे (३३), जितेंद्र शत्रुघ्न आटोटे (३३) या चार आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांची ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here