मूर्तिजापूर | ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या !…आत्महत्या करण्यापूर्वी काढला Video…

मूर्तिजापूर – तालुक्यातील साखरी या गावातील एका तरुण शेतकर्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक Video काढला आणि आत्महत्येस जबाबदार कोण आहेत हे सांगितले. वयाच्या ३२ व्या वर्षी एवढा कठोर निर्णय घेतल्याने गावकर्यांनाही अचंभित केले आहे.

प्रवीण बाबुलाल पोळकट असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याच्याकडे दोन एकर शेती आहे. वडिलांना तोंडाचा कन्सर असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. त्याच्यावर को. ऑप बँक तसेच महिंद्रा कोटक कर्ज आहे. तर महिंद्रा कोटक फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी हप्ते थकल्याने त्याचा छोटा ट्रॅक्टर नेल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झाला. त्याने शेतात १८/११/२०२१ ला २१ ला दुपारी ४ वाजता विष घेतले.

विष घेतल्याची माहिती मिळताच गावकर्यांनी धाव घेतली आणि त्यला उपचारासाठी अकोला रुग्णालयात हलविले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. विष घेण्यापूर्वी त्याने मोबाईलवर Video काढला आणि त्यानंतर विष घेतले त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली (एक ४ वर्षाची, एक २ वर्षाची) तसेच आजारी आई वडील आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने हा Video काढला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here