मूर्तिजापूर | शिवाजी चौकातील ३० फुटी पथदीप टॉवर कोसळला…

मूर्तिजापूर शहरातील मुख्य चौक असलेल्या शिवाजी चौकात उभा असलेले हायमास्ट पथदीप टॉवर टिप्परने दिलेल्या धडकेने जमीनीवर कोसळला, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आज शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान घटना.

मूर्तिजापूर शहराच्या नेहमी वर्दळ असलेल्या शिवाजी चौकात विद्युत रोषणाईसाठी काही वर्षांपूर्वी ३० ते ३५ फुट उंच लोखंडी टॉवर उभारण्यात आले होते. गत अनेक दिवसांपासून त्याचे काही नट-बोल्ट निखळून पडले होते.

सदर ठिकाण अतिशय वर्दळीचे महत्त्वाचा चौक असल्याने या चौकात नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यातल्या त्यात बाजाराचा दिवस असल्याने गर्दीचे प्रमाणात अधिक होते,

शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजताच्या दरम्यान एका टिप्परचा विद्युत टावरचा धक्का बसल्याने तो संपूर्ण खांब जमीनीवर कोसळला टिप्परचा धक्का लागल्याचे पाहून गर्दी विखुरल्या गेली तेवढ्यातच तो खांब खाली पडला. दैव बलवत्तर म्हणून यात कुठलीही हानी झाली
नाही.

या घटनेत सेकंदाच्या फरकाने अनेकांचे प्राण वाचल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले या चौकात फळाच्या गाड्या, भाजीपाल्याची दुकाने व इतरही दुकाने आहेत सुदैवाने त्याबाजुने खांब कोसळला नाही तसे झाले असते तर मोठी जीवत हानी झाली असती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here