मूर्तिजापूर | तलाठ्याच्या बाजुने उभे ठाकले १५० ग्रामस्थ… तक्रारकर्त्यावरच उलटले अस्त्र

मूर्तिजापूर,ता.१२ : ‘आमच्या गावातील तलाठ्याची आम्ही तक्रार केली नाही, तक्रारकर्ते नेहमीच असा उपद्व्याप करून शासकीय कामात खीळ घालण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तक्रारीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा’,असे आवाहन तहसीलदारांना करणारे निवेदन आज सुमारे १५० ग्रामस्थांनी प्रसिद्धीसाठी दिले.

गाझीपूर, गोरेगाव, सांजापूर च्या ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्यांनिशी दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, तलाठी संदीप बोळे गेली ५ वर्षे शासनाची सर्व कामे प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यांची वागणूक नम्र व सहकार्याची आहे.

शेतकरीच नव्हे, तर शेतमजुरांची, भूमीहिनांची कामे सुद्धा ते आनंदाने करता. कोरोना काळातही त्यांनी अविरत सेवा दिली आहे. त्यांची तक्रार करणारे नेहमीच असे प्रकार करतात, त्यामुळे त्यांच्या खोट्या तक्रारीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा व त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन आदी सुमारे १५० ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here