हत्येने तेल्हारा तालुका हादरला…सख्खा भाऊ ठरला वैरी…चाकूने वार करून भावाची केली हत्या

फोटो -सौजन्य गुगल

तेल्हारा: गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत तळेगाव बाजार येथील रहिवासी शिवाजी गणेश मापे वय 40व त्याचा भाऊ हरिदास गणेश मापे वय 35 या दोघा भावा मधे बाचाबाची होऊन या वादात लहान भाऊ हरिदास गणेश मापे याने चाकुने शिवाजी गणेश मापे यांचे छातिवर सपासप वार करून जीवे मारून टाकले.

सदर घटना गुरुवारी रात्री घडली. तसेच कुनीही मधात येउ नये म्हणून हरिदास चाकु घेऊन उभा होता व कोणीही मधात आलें तर खुपसून देईन असे धमकावत होता.त्यामुळे कुणिही मधे गेले नाही. गावातील नागरिकांनी हिवरखेड पोलिस स्टेशन फोन करून घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. संशयित आरोपी आपल्या पत्नीला व मुलांना घेऊन मोटरसायकल ने जात असल्याची गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली भांडणाचे मुळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here