शरद नागदेवे
नागपूर- कोतवाली ठाण्याअंतर्गत उधारीच्या पैशावरूण झालेल्या भांडणात युवकाची हत्या करण्यात आली.सदरची घटना शुक्रवारी रात्री जुनी शुक्रवारी येथे घडली.या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.आंनद झाडे (२८) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
आनंद झाडे याने नविन सोनी नावाचा मीत्राला उधार पैसे दिले होते.ते पैसे घेण्यासाठी शुक्रवारी रात्री फिर्यादी यश सावरकर (१९) आणि त्याचा मीत्र आनंद झाडे हे दोघेही एकाच दुचाकीवरून रात्रीं निघाले.हनुमान गल्ली मार्गाने जात असतांना नवीन ने आनंदला आवाज दिला.
आनंद हा दुचाकीवरून खाली उतरला आणि देवांजली अपार्टमेंट मागील रोडवर गेला असता.आरोपी नविन सोनी,पंकज शेंद्रे,राहुल काळे आणि प्रविन नेरकर यांनी संगनमत करून आनंदवर हल्ला चढविला,चाकू, कुऱ्हाड आणि टयुबलाईटने आनंदचा गळ्यावर,छातीवर घाव घालून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले रक्तबंबाळ झालेला आनंद खाली कोसळताच आरोपी फरार झाले
बराच वेळ होऊन आनंद न परतल्याने त्याचा मीत्र यश घटनास्थळी पोहचला.समोरचे दुश्य पाहुन त्याचा पाया खालची वाळू सरकली.त्याने पोलीसांना माहिती दिली.घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली.फिर्यादिच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोदंविला.