बोदवड तालुक्यातील चिंचखेड सिमच्या बळीराम पाटील ची हत्या की आत्महत्या? पोलिस पाटीलने पोलीस स्टेशन ला माहिती दिली नाही, चौकातील चर्चा…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड तालुक्यातील चिंचखेड सिम येथील बळीराम तोतराम पाटील यांनी आपल्या राहत्या घरी दि 3 सप्टेंबर रोजी रात्री साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या बाबतची माहिती पोलीस पाटील ने पोलिस स्टेशन ला दिली नसल्याचे दिसून येते, याबाबत चौकात चर्चेला उत आला आहे,

याबाबत सविस्तर माहिती अशी की बळीराम तोतराम पाटील रा चिंचखेड सिम यांनी रात्री 3 सप्टेंबर रोजी आपल्याराहत्या घरात साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार सकाळी लक्षात आला, बळीराम पाटील यांची पत्नी बाहेर गावी गेली होती,मुले मुंबई ला राहतात,

बळीराम पाटील सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते अनेक सामाजिक कार्यात ते भाग घेत असत,त्यानी शाळेला गेट देणगी दिली होती असे गावातील नागरिकांत बोलले जाते, मागील पंच वार्षिक ग्राम पंचायत च्या निवडणुकीत ते अवघ्या एक मताने पराभूत झाले होते, अशीही गावात चर्चा आहे, त्यानी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला,त्यांच्यावर शेतीचे कर्ज होते का?

गावांत कुठलीही अनुचित घटना घडली तर याची माहिती गावच्या पोलीस पाटीलने पोलिस स्टेशन ला देणें आवश्यक आहे ,या बाबत पोलिस पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी, बाहेर गावी होतो,मला माहिती नाही,देशात देशात कोरोना सारख्या महामारीने जनता त्रस्त असून पोलीस पाटील पोलीस पाटील,

सरपंच ,यांनी याबाबत दक्ष असले पाहिजे परन्तु बळीराम पाटील यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली अशी चौकात दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे,बोदवड पोलिस स्टेशन ला सुद्धा या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नाही असे बिट हवालदार यांनी सांगितले, बीट हवालदार व त्यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here