गोंदिया | मजुरीसाठी गेलेल्या इसमासह तीन मुलांची हत्या…

फोटो -सौजन्य गुगल

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या टोयाटोला येथील रहिवासी सुरेश कैलास वलके वय 36 वषे आपल्या 2 मुली आणि 1 मुलासह गुजरात येथील सुरत येथे मजुरीच्या कामासाठी गेला होता.

परंतू, १४ नोव्हेंबरला सदर सुरेश व,2मुलींची आणि 1 मुलाची हत्या करुन प्रेत तलावात आणि शेतशिवारात मिळाले असल्याने घटनेची गंभीरता लक्षात घेता सीबीआय चौकशीसाठी माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वाखाली २२ नोव्हेंबरला भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.

देवरी तालुक्यातील तथा आदिवासी क्षेत्रातील टोयाटोला येथील रहिवासी सुरेश कैलास वलके हा आपल्या 2 मुली आणि 1 मुलगा यात मुलगी कु. ग्रेसी वय १३ वर्ष ,कु. रुक्ष वय – ६ वर्ष आणि मुलगा मोक्ष वय – ३ वर्ष यांच्यासह काही दिवसाआधी गुजरात मधील सुरत या शहरात मजुरीवर काम करण्यासाठी गेला होता. यात विशेष म्हणजेच, सुरेश याची पत्नी सुरेशला आणि तिन्ही मुलाबाळांना सोडून 3ते 4 वर्षाआधीच सोडून माहेरी गेलेली आहे.

सुरेश आणि त्यांच्या मुलाबाळांची हत्या होण्याच्या घटनेच्या एक दिवसाआधी सुरेशने आपल्या काकांना पैशाची अडचण आहे. म्हणून मोबाईल संपर्क सुद्धा केला होता. परंतू , लगेच दुसऱ्या दिवशी सुरेशचे प्रेत सुरतच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शेतशीवारात आणि मुलांचे तलावात प्रेत असल्याचे टोयाटोला येथील कुटूंबियांना सांगण्यात आले. सदर घटना गंभीर असूनही आरोपीचा शोध लागला नसल्यामुळे सीबीआय मार्फत चौकशी करुन सदर आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.

यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री यांना स्थानिक तहसीलदार मार्फत निवेदन पाठवण्यात आले असुन स्थानिक अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांना सुद्धा भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. यावेळी मृतकाचे वडील कैलास वलके,भाऊ मनोज वलके, माजी आमदार संजय पुराम, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे,

सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमल येरणे, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल बिसेन, आनंद नळपते, गजानन शिवणकर, विजय मडावी, महिला तालुकाध्यक्षा देवकी मरई, माजी तालुकाध्यक्षा नूतन सयाम, नमीता नेताम, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने आणि उपाध्यक्ष दिपक शाहू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here