यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या…विद्यार्थी झाले संतप्त…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ च्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टर ची रात्री हत्या धारदार शस्त्राने हत्या झाली आहे. अशोक पाल हा MBBS च्या फायनल इयर चा विद्यार्थी होता वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. डॉ अशोक पाल असे विद्यार्थ्यांचे नाव मूळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे त्याच्या हत्येचे कारण अस्पस्ट आहे पोलीस या प्रकरणात आता तपास करीत आहेत.

मेडीकल कॉलेज परिसरात संतप्त विद्यार्थीकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिकावू डॉक्टर यांनी मेडिकल चे गेट बंद केलाय आणि डॉ अशोक पाल न्याय मिळे पर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेत मुख्य प्रवेशद्वार ला कुलूप लावले आहे त्यामुळे मेडिकल चे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कुणालाही मेडिकल परिसरात प्रवेश नाही त्यामुळे रुग्ण बाहेर आहेत.

मेडिकल ची सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि आरोपींना अटक करावी तसेच मेडिकल चे डीन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिकावू आंदोकल डॉक्टर यांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत 2 संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.डॉ अशोक पाल याचे वडील आटोचालक होते अशोक हा अत्यंत प्रतिभावान विद्यार्थी होता सतत अभ्यासात तो रममान राहायचा विशेष म्हणजे त्याच्या वडिलांचे निधन दहा वर्षांपूर्वी झाले त्याचे वडील ऑटोचालक होते आणि त्याच्या घरी त्याची आई आणि त्याच्या दोन लहान भावंडासह सांभाळ करत त्याने MBBS चे शिक्षण घेतलं होतं.

आणि आता mbbs शिक्षणाचे फक्त तीन महिने शिल्लक राहिले होते. डॉ अशोक यांचे मामा त्याचा कुटुंबातील सदस्यांनाचा पालक म्हणून सांभाळ करत होते अशा परिस्थितीत आता होतकरू मुलगा जिवानिशी गेल्याने त्यामुळे परिवारा मोठं संकट कोसळले आहे असे मामा यांनी सांगितले

डॉ संजय पाल ( मृत अशोक पाल चे मामा )

कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी महाविद्यालयात दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता महाविद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता मात्र या ठिकाणी शहरातील कॅम्पस बाहेरील काही व्यक्ती या ठिकाणी आले होते त्याच्यात आणि शिकाऊ डॉक्टरांमध्ये वाद झाला होता हे बाहेरील व्यक्ती हे मुलीच्या वसतिगृहा जवळ लघुशंका करत होते त्यातुन या वादला सुरुवात झाली वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले त्यावेळी महाविद्यालयाचे डीन,

पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद निस्तारला होता मात्र काल रात्री 10 वाजताच्या सुमारास लायब्ररी मधून अशोक हॉस्टेल कडे जात असतानाअज्ञात 2,3 मारेकऱ्यांना अंधाराचा फायदा घेत निर्मनुष्य जागी अशोकवर धारधार शास्त्राने हल्ला केला त्यात त्याला वर्मी घाव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असा संशय पोलीसानी व्यक्त केला आहे

पोलीस अधीक्षक

आज सकाळी पासून रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, आक्रमक झाले असून त्यानी रुग्णालयाच्या सर्व गेट बंद करत आंदोलन सुरू केले एकही रुग्ण रुग्णालयात येऊ दिला जात न्हवता यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलींद कांबळे यांनी राजीनामा द्यावा , आरोपी अटक करा अशी मागणी करण्यात आली सुमारे 9 तासा डॉक्टराचे आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी डॉ अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी मध्यस्थी करत आंदोलन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान विद्यार्थी आणि प्रशासन याच्यात चर्चा सुरू असताना शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी विद्यार्थ्यांसोबत दमदाटी केली त्यानंतर परिसरातील वातावरण चिघळले आणि आंदोलक विद्यार्थी संतप्त झाले आणि शिवसेनेचे संतोष ढवळे यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली

पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ

या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नर्सेस संघटना, ima , सफाई कामगार संघटना, यांनी पाठिंबा दिला

आशा खडसे नर्सेस संघटना

रुग्णालयात स्ट्रीटलाईट नाही, सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना नाही , त्यामुळे ही घटना घडली याला जबाबदार डीन असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थी यांनी केला त्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांनी सदर प्रकरणाची प्रशासकीय जबाबदारी व आंदोलकांचा रोष लक्षात घेता राजीनामा राज्य आयुक्त वैधकीय शिक्षण यांना पाठविला आहे

डीन मिलींद कांबळे

पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करत 2 पथका कडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ सुरेंद्र भुयार यानि दिलेल्या तक्रारीवरून
तुषार नागदेवते रा वाघापूर यवतमाळ व आकाश गोफने रा वाघापूर, या दोघाना पोलिसांनी अटक केली असून नेमकं हत्या करण्यामागचे कारण काय ह्याचा तपास पोलीस करत आहे.मात्र यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात अशी घटना घडल्याने यवतमाळचे नाव शरमेने खाली गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here