नागपुरात पोलिस ठाण्याजवळ गुन्हेगाराची हत्या…चर्चित मोहित पीटर हत्याकांडात होता आरोपी…

फोटो -सौजन्य गुगल

नागपूर – शरद नागदेवे

एकीकडे दिवाळीच्या निमित्तानं पोलीसांनी शहरात गुन्हेगारांची धरपकड जोमात सुरू केली असून तरीपण शहरात गुन्हेगारीवर अंकुश बसला नाही.मंगळवारी रात्री जरिपटका ठाण्याजवळ एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. मुतक कौशल्या नगर अजणी येथील रहिवासी फ्रैंक शुभणम अंथोनी आहे.त्याचे वय (२७) सांगितले जात आहे.ष्रेंक मानकापूर येथील चर्चित मोहित पीटर हत्याकांडातील आरोपी होता.माहितीनुसार मंगळवारी रात्री तो जरिपटका ठाण्या जवळील खोब्रागडे चौकात उभा होता.

दरम्यान त्याचा काही लोकांन सोबत वादविवाद झाला.शिवीगाळीने सुरू झालेला विवाद हातापाईवर आला.५ ते ६ युवकांनी त्याला घेरले व डोक्यावर मोठ्या दगडाने प्रहार केला.घटनास्थळीच त्याचा मुत्यू झाला.घटनेची बातमी मीळताच जरिपटका ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.फ्रेंकला रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात त्याला मुत घोषीत करण्यात आले.

पोलीसांनी तपासात तत्परतेने ३ आरोपींना अटक केली.दोघा आरोपींचा शोध सुरू आहे.सुरवातीचा तपासात शिवीगाळ केल्यामुळे हत्या केली असं सांगण्यात येत आहे.परंतू सुत्रांकडून बातमी अशी मीळाली की मागील काही दिवसांपासून फ्रेंंक त्याचे मीत्र मॅडी व शाहारुबची जमाणत करण्यासाठी धरपड करत होता.

मॅडी आणि शहारुबला मोहीत पीटरच्या हत्येत सजा झाली होती.काही दिवसांपूर्वी शहारुबला पोलीसांनी माऊजर सोबत अटक करण्यात आली होती.माहिती अशी आहे की मॅडी गॅंगनी एका बिल्डरची सुपारी घेतली होती.त्याची भणक विरूद्ध गटाला लागली.उशीरा रात्रीपर्यंत पोलीसांचा तपास सुरू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here