चाकणला कचरा वेचणाऱ्या इसमाचा डोक्यात घालून खून…

राजगुरूनगर ( पुणे ) : पुणे नाशिक महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या भाजीपाला मार्केटजवळील सिमेंटच्या कट्ट्यावर एका कचरा वेचणाऱ्या ४८ वर्षीय इसमाचा डोक्यात दगड घालून अज्ञाताने खून केल्याचे उघड झाला असल्याची चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू शांताराम नाणेकर ( वय.४६ वर्षे,रा.नाणेकरवाडी, ता.खेड,जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदास राजाराम डुंबरे ( वय.४८ वर्षे,सध्या रा.एसटी बस स्थानक जवळील भाजी मार्केट,पत्रा शेड,चाकण,मूळ रा.ता.पाथर्डी,जि.अहमदनगर)

या कचरा गोळा करणाऱ्या इसमाचा कोणी तरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केला आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गु.र.नंबर १०७६/२०,भा. द.वि.कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी.एस.दांडगे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here