मूंदडा ते नांदसावंगी दरम्यान पुल करते आहे मौत का कुवाॅ, पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचारी कारभार…

बडनेरा – मच्छिंद्र भटकर

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा मुंदवाडा ते नांदसावंगी या गावा दरम्यान अमरावती पाटबंधारे खात्याच्या जलसंपदा विभागा तर्फे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कंत्राटदाराला कंत्राट देऊन रस्त्यावरिल नाला खोलीकरण व रूंदीकरणाचे, कामनिकृष्ट दर्जाचे केल्याने व खड्डै निर्माण झाल्याने अपघाताची माली का सुरुच आहे, असा नागरिकांची आरोप आहे.

अमरावती पाटबंधारे विभागाध्यक्ष जलसंपदा विभागा मार्फत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मुंदवाडा ते नांदसावंगी या गावांदरम्यान रस्त्यावर नाला खोलीकरण व रूंदीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले मात्र पाटबंधारे विभागा च्या व कंत्राटदाराच्या अर्थपूर्ण व्यवहारिक संबंधा मुळे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले त्याचेच परिणाम म्हणून काही दिवसातच रपट्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले, व अपघाताची माली का सुरु झाली.

सध्या शेतकर्याच्या रब्बीपिकासाठी कालव्यां मधून पाणी सोडण्यात येत आहे, येथे तयार करण्यात आलेल्या नाल्याचे खोलीकरण व रूंदिकरण योग्य प्रमाणात करण्यात न आल्या मुळे पाणी रपट्यवरून वाहत आहे, पाण्यामुळे रपट्यावर असलेल्या खड्याचा अंदाज वाहन धारकांना येत नाही,

त्याकारणाने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहें, आमचे प्रतिनिधि मच्छिंद्र भटकर या नाल्या चे चित्रिकरण करीत असतांनाच दुचाकीवरून एक महिला कोसळल्याची दूर्दैवी घटना चित्रीत केली.सुदैवाने महीलेला गंभीर ईजा झाली नाही,तरी पाटबंधारे विभागाने या पुलाच्या रपट्याची ताबडतोब दुरूस्ती करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here