मुंबई-पुणे महामार्गावर कार आणि कंटेनरची धडक…५ ठार…

सौजन्य - ANI (twitter)

न्युज डेस्क – लोणावळा येथील शिलाटणे गावाजवळ रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. कार आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. मृतदेह खंडाळा रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पुणे-अहमदनगर रस्त्यावर रविवारी ट्रकने कार आणि दोन मोटारसायकलला धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील दोन आणि दोन मोटारसायकलवरील तीन जणांचा मृत्यू झाला, असे शिकारपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

“रविवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि वाहन दुभाजकावर जाऊन धडकले. चालक पळून गेला आहे. एर्टिगामधील प्रवासी एका लग्नात सहभागी होऊन पुण्याला परत जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here