राज कुंद्राच्या ऑफिसवर मुंबई पोलिसांचा छापा…अश्लील चित्रपटांशी संबंधित महत्वाचे पुरावे हाती…

न्यूज डेस्क – बुधवारी सुप्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात कुंद्राच्या कार्यालयातून एक सर्व्हर सापडला आहे. या सर्व्हर द्वारे व्ही-ट्रान्सफरद्वारे पॉर्न व्हिडिओ अपलोड केले गेले होते. मात्र, पोलिस हार्ड डिस्क व सर्व्हर जप्त करून तपास करत आहेत. तपासणीनंतर धक्कादायक खुलासे बाहेर येवू शकतात.

बुधवारी सायंकाळी मुंबई पोलिसांनी वियान इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यालयावर तसेच अन्य काही ठिकाणी छापा टाकला आहे. पोलिसांनी कुंद्राचा आयफोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. राज कुंद्रा हे 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

शिल्पाची चौकशी होऊ शकते, मेहुण्याला नोटीस बजावली जाईलः

शिल्पा शेट्टी यांच्यावरही या प्रकरणात चौकशी केली जाऊ शकते. येथे कुंद्रा यांचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्याविरूद्ध ‘लुकआउट’ नोटीसही बजावण्यात आली आहे. बक्षी हे केनरीन कंपनीचे सह-मालक आहेत, ज्याने ‘हॉटशॉट’ मोबाइल अप्स विकसित केला आहे. या प्रकरणात त्याला सहआरोपी करण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे की 4 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी छापा टाकून कारवाईचा बडगा उगारला होता.

कुंद्राच्या बँक खात्याचा तपशीलही समोर आला आहे. त्याची दररोज सरासरी 7 लाखाहून अधिक उत्पन्न मिळत असल्याची माहिती उघड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here