मुंबई पोलिसांनी चक्क गटारातून शोधून काढलं २१ लाखाचं सोनं…

न्यूज डेस्क – मुंबई – जुहू पोलिसांनी चक्क गटारातून चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध घेत २१ लाखाचं सोनं गटारातून काढलाय. चोर हा चोरी केल्यानंतर गटारीच्या झाकणाच्या खाली लपवून ठेवतं होता.

जुहू पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतलं, तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करत होता. पोलिसांनी या चोराला ताब्यात घेत त्याच्याकडून 21 लाख किमतीचे दागिनेही जप्त केले. हा संपूर्ण प्रकार जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

नेहरू नगर परिसरात राहाणारी पुजा आपल्या कुटुंबासह महाबळेश्वरला फिरायला देली होती. जेव्हा ते महाबळेश्वरवरुन माघारी आले, तेव्हा त्यांना दिसलं, की घरात चोरी झाली आहे. घराची तपासणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की जवळपास 21 लाखाचे दागिने चोरी झाले आहेत. पुजानं घरी झालेल्या या चोरीची जूहू पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी समजलं, की जेव्हा चोरी झाली, तेव्हा पुजाच्या कुटुंबातील कोणीही घरी नव्हतं. पोलिसांनी आजूबाजूला विचारपूस केली असता, एका मुलानं आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बिअर बॉटलसह इतर सामान ऑर्डर केल्याची माहिती मिळाली. याच कारणामुळे पोलिसांनी चोराचा पत्ता लागला.

पोलिसांनी सांगितलं, की चोरी करणारा मुलगा नववी नापास आहे आणि कामाच्या शोधात आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना समजलं की, तो मुलगा मित्रांसोबत पार्टी करत आहे. यानंतर पोलिसांना संशय आला आणि याच आधारावर त्या तरुणाला पोलिसांनी पकडलं.

चौकशीदरम्यान या मुलानं गुन्हा मान्य केला. त्यानं सांगितलं, की याआधीही त्यानं अनेकदा चोरी केली आहे आणि तो चोरी केलेलं सोनं मॅनहोलमध्ये लपवून ठेवत असे. पोलिसांनी या तपासानंतर मॅनहोलमधून 21 लाखाचे दागिने बाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here