मुंबई पोलिसांकडून ११०० नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती..!

प्रणव हाडे

पोलीस प्रशासनावरील वाढणारा ताण लक्षात घेत आता मुंबई पोलिसांकडून आता 1100 नागरिकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या नागरिकांद्वारे मुंबईमधील ज्या इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. त्या इमारतींची देखरेख करणे यासोबतच परिसरामध्ये नागरिकांची गर्दी झाली असेल तर याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनला माहिती देणे,

इमारतींमधील कोरोना बाधित रुग्णांची मदत करणे यासाठी नागरिक आणि पोलिस यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा यासाठी विशेष काळजी घेणे अशी जबाबदारी या विशेष पोलिस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. अशा प्रकारे आपण देखील या परिस्थितीमध्ये पोलिसांना म्हणजेच एकप्रकारे शासनाला मदत करतोय असं नियुक्त झालेल्या नागरिकांना अभिमान वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here