मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणूक श्री. शरद पवार पुन्हा अध्यक्षपदी…

मुंबई – गणेश तळेकर

आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणार्या , महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणार्या “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या” अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. महाराष्ट्र व भारताचे अग्रणी नेते श्री. शरद पवार या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत सहज निवडून आले. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. उपाध्यक्ष पदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते. तीही निवडणूक एकतर्फीच होवून सात दिग्गज उमेदवार निवडून आले.

निवडून आलेल्यात, 1) सौ विद्या चव्हाण, माजी आमदार 2) श्री. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू 3) माजी हायकोर्ट न्यायाधीश श्री. अरविंद सावंत हे सर्वज्ञात चेहरे आहेत तसेच श्री़. प्रदीप कर्णिक, श्री.प्रभाकर नारकर, कु.अमला नेवाळकर, श्री. शशी प्रभू, हेही विद्वजन निवडून आले. 15 कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली. लवकरच कार्यकारिणी सदस्यांमधून, दाधिकारी नेमण्यात येतील.

किरण सोनवणें, निवडणूक अधिकारी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय

कार्यकारिणी सदस्य – श्री.जयवंत गोलतकर, श्री.सुरेंद्र करंबे, श्री.उदय सावंत, श्री.रवींद्र गावडे, श्री.सुनील राणे, श्री.विनायक परब, श्री. प्रदीप ओगले, श्री. हेमंत जोशी,
श्री मनीष मेस्त्री, सौ.शीतल करदेकर, श्री.मारुती नांदविस्कर, सौ. उमा नाबर, श्री.सूर्यकांत गायकवाड, सौ.शिल्पा पितळे, श्री.स्वप्निल लाखवडे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here