शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकावणाऱ्या व्यक्तीला मुंबई एटीएसने केली अटक…

न्यूज डेस्क – शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकावणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पलाश घोष असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोलकाता पोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी रात्री कोलकाता येथून अटक केली. आता त्याला मुंबईत आणण्याची तयारी सुरू आहे.

दक्षिण कोलकाता येथील टॉलीगंगे भागात राहणारा पलाश घोष याला मुंबई एटीएसने अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ कॉलवरून त्यांनी शिवसेना खासदाराला धमकावल्याचा आरोप आहे. पलाश यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याचा ट्रांजिट रिमांड मागविला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here