महावितरणचा ग्रामीण भागात भोंगळ कारभार; ३३ केव्ही लाईटच्या जळालेल्या केबल ला चिकट पट्टी व रबराचा आधार…

डहाणू – जितेंद्र पाटील

डहाणू तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासून महावितरणाचा भोंगळ कारभार सुरूच आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल जीर्ण झाले असून अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वारंवार तक्रार करून देखील महावितरणकडून ग्रामीण भागातील समस्यांची दखल घेतली जात नाही.

लोडशेडींग नसताना पण वीज का ये जा करते? असा प्रश्न ग्रामीण भागातील लोकांनी केला आहे. त्यातच वेती गावातील बेलपाडा येथे असलेले 33केव्ही ट्रान्स्फार्मर चे विजेच्या तारा पूर्ण पणे जळाल्या असून 2018 ला आज पर्यंत त्याच्यावर कुठल्याही संबंधित अधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही. गेल्या 2 वर्षांपासून लेखी पत्र देऊन सुद्धा महावितरण अधिकारी धोडी डहाणू विभाग यांनी कुठलाही पाठपुरावा केलेला नाही.

तारा पेटल्या मुळे नेहमी लाईट ये जा करत असते.सतत तारेमधून स्पार्क होत असल्याने मोठा गंभिर प्रकार घडू शकतो. वायरमन पण तात्पुरती चिकट पट्टी व रबराच्या साहाय्याने तडजोड करून निघून जातो. ग्रामीण भागातील प्रश्न महावितरण कडून सुटायला अजून किती वर्ष वाट पाहावी लागणार? असा प्रश्न वेती गावातील ग्रामस्थांना पडला आहे.

गेल्या 2 वर्षा पासून जळालेल्या ट्रान्स्फार्मर च्या तारा बदलून देण्यात यावी यासाठी आम्ही वेती ग्रामपंचायत कडून लेखी पत्रक देऊन सुद्धा आजवर संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलाही पाठपुरावा झाला नाही. विठ्ठल भोईर वेती ग्रामपंचायत सभासद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here