ऊर्जा मंत्र्यांचा गृह जिल्ह्यातच महावितरण अधिकारी बिनधास्त तर बटन ऑन वीज बंद मुळे नागरिक चिंतेत…

बावनकुळे साहेब च!!!!!! बरे होते गा भाऊ ऊर्जा मंत्री………

काचुरवाही/रामटेक – गेल्या तीन महिन्यांपासून सतत छोट्या मोठ्या कारणाने महावितरण विभागाचा वीज पुरवठा खंडित होणे हे नेहमीचेच झाले असून याकडे जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि महावितरण विभागाचे गांभीर्याने लक्ष नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. गेले तीन महिने पासून रोज दिवसातून अनेकदा वीज पुरवठा हा खंडित होत आहे.

तर ग्रामीण भागात याकडे लक्ष देण्यासाठी लाईनमन सुद्धा नाही. काचुरवाही हे गाव रामटेक तालुक्यात चार हजार लोकवस्तीचे गाव असून सभोवताली असलेले गाव हे देखील सुमारे दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे आहेत,

परंतु गेल्या काही महिन्यांपासून येथील लाईनमन ची बदली झाल्यापासून काचुरवाही सह आदी गावांना महावितरण विभागाने पोरखं वाऱ्यावर सोडून दिलं आहे. यामुळे दररोज येथील नागरिक आणि शेतकऱ्यांना चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.


कुठलेही वादळ वारा पाऊस न येताच लाईन तासनतास जाते तर कधी कधी रात्र रात्र बंद असते. परंतु महावितरण च्या अधिकारी कर्मचारी यांना संपर्क केला तर योग्य ते उत्तर मिळत नाही.


काचुरवाही सह खोडगावं, किरणापुर, मसला, वडेगाव, चोखाला, खंडाळा, शिरपूर असे आदी गावात सर्वत्र शेतकरी वर्ग असून सर्वांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असल्याने सर्वांना घरा सह शेतात देखील विजेची आवश्यकता असते त्यामुळे या विजेचा लपंडावाने ग्रामिणांना संतप्त करून सोडले आहे.

यामुळे काचुरवाही, खोडगाव, खंडाळा, मसला, किरणापुर, चोखाळा, वडेगाव येथील नागरिकांत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून बावनकुळे साहेबच…. बरे होते गा भाऊ!!!!…. ऊर्जा मंत्री अशी चर्चा रंगू लागली असून.

ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या ऊर्जामंत्री पदभार सांभाळलेल्या कार्यकाळा पासून विजेचा लपंडावाणे नागरिक बावनकुळे यांची आठवण काढू लागले आहेत. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याचे असून नागपूर जिल्ह्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री राहिले त्यावेळी त्यांचा कार्यकाळात नागरिकांना या समस्या निर्माण झाल्या नाही परंतु सत्ता परिवर्तन झाल्यापासून

मा. नितीन राऊत नागपूर जिल्ह्याचे यांना म्हणजेच नागपूर ला परत ऊर्जामंत्री पद तर मिळाले परंतु बावनकुळे साहेबा सारखे महावितरण वर लक्ष नसल्याने महावितरण चा अनागोंदी कारभार सुरू झाला आहे. अधिकारी कर्मचारी कार्यालयातच मग्न असल्याचे रोजचे चित्र होऊ लागले आहे. जर बावनकुळे साहेबांच्या प्रमाणेच या मंत्र्यांनी देखील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवले तर अशे प्रसंग उद्भवणार नाही अशे नागरिक गल्लीबोळात चर्चा करू लागले आहे.


एकीकडे देशात सर्वत्र लॉकडाऊन गेली तीन महिन्याच्या कालावधी पासून सुरू असताना देशात सर्वत्र कंपन्या कारखाने बंद असताना विजेचा वापर देखील अत्यंत कमी झालेला आहे, आणि वीज उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात सुरळीत असताना देखील जर वीज वितरण अधिकारी कर्मचारी व्यवस्थापन करू शकत नसतील तर अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हायला पाहिजे. अशे ही नागरिक बोलू लागले आहेत.

@राहुल किरपान, भाजयुमो. तालुका अध्यक्ष

ग्रामीण भागातील लोकांना वीज रात्री बे रात्री वारंवार ये जा करत असल्यामुळे अंधाराचा व पूर्ण उन्हाळा भर उष्णतेचा सामना करावा लागत आहे उर्जामंत्र्याचा गृहजिल्ह्यात हे हाल असतील उर्वरित महाराष्ट्राने उर्जामंत्र्या कडून काय अपेक्षा करावी आम्ही अनेकदा उपविभागीय अधिकाऱ्यांना हि बाब लक्षात आणून दिले तरी हा विषय मार्गी लागत नसेल आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here