वीजबील वसुलीस गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की…आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल…

फोटो -सौजन्य गुगल

महेंद्र गायकवाड
नांदेड
थकबाकीदार वीजग्राहकांकडील थकबाकी वसुली मोहीम सर्वत्र सुरू आहे. काल नांदेड जिल्ह्यातील मौजे सायाळ येथे वीजबील वसुलीस गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वीजग्राहक बालाजी सखाराम जामगे याच्या विरोधात लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीजबीलाची थकबाकी वसुलीसाठी सायाळ गावामधे गेले असताना थकबाकीदार वीजग्राहक एस.डी. जामगे यांच्याकडील थकबाकी भरा अन्यथा वीजपुरवठा खंडीत करवा लागेल असे सांगत असताना बालाजी सखाराम जामगे यांने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ मोहम्मद जावेद मो.युसूफ यांना कॉलर पकडत शिवीगाळ केली.तसेच वीट उगारून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देत, शासकीय कामात दहशत निर्माण करून अडथळा निर्माण केला.   

झाल्या प्रकाराबाबत लिंबगाव पोलीस ठाण्यात शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बालाजी सखाराम जामगे विरोधात सरकारी कामात अडथळा आणून धक्काबुक्की केल्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या मारहाणचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून याप्रकरणी पोलीसांनी गांभिर्याने लक्ष देवून कठोर कारवाई करावी अशी मागणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here