कुंडलवाडी नगर परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ.सुरेखा जिट्टावार

नांदेड- कुंडलवाडी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ.सौ.अरुणा कुडमुलवार यांना शासनाने जातवैधता प्रमाणापत्रा अभावी अपात्र केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सदस्यांमधून नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक जाहीर केली.

त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या पोट निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ. सुरेखा नरेंद्र जिट्टावार यांची निवड झाली असून त्यांनी भाजपच्या सौ.रेहाना बेगम पाशामिया यांना पराभूत केले आहे.

कुंडलवाडी नगर परिषदेची पोट निवडणूक ही सदस्यामधून झाली नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होते.आज झालेल्या सभेत सौ. जिट्टावार यांना 10 मते सौ रेहाना बेगम यांना 6 तर एक सदस्यांना कुणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवार सौ सुरेखा जिट्टावार यांची निवड झाली आहे.

या निवडणुकीत आ. अमरनाथ राजूरकर हे किंगमेकर ठरले असून शिवसेनेचे सुभाष साबणे ,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी ,शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,प्रकाश मारावार,माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार,मनपानगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here