नांदेड महानगरपालिका महापौर पदासाठी सौ.मोहिनी येवनकर तर उपमहापौर पदी मसूद खान यांचा एकमेव अर्ज…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने महापौर पदासाठी सौ.मोहिनी विजय येवनकर आणि उपमहापौर पदासाठी मसूद खान यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. यामुळे हि निवड बिनविरोध ठरणार आसून केवळ निवडीच्या घोषणेची औपचारिक बाकी राहिलेली आहे.

नांदेड महानगर पालिकेच्या महापौर उपमहापौर पदाचा कालावधी संपला असून कोरोना मुळे निवड प्रकिया लांबणीवर पडली होती. परंतु शासनाने ही निवड प्रक्रिया घेण्याचे आदेश देताच महापौर व उपमहापौर निवडीचे कामकाज चालू झाले आहे. काँग्रेस कडून महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी एकमेव अर्ज आल्याने केवळ औपचारिकता बाकी आहे.दि. २२ सप्टेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

भाजपाकडे संख्या बळ नसल्याने महापौर व उपमहापौर काँग्रेस पक्षाचेच होणार असे आसताना केवळ ही निवडणूक बिनविरोध होउ नये म्हणून भाजपाच्या वतीने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आला होता मात्र आज तो दाखलच करण्यात आला नाही. महानगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे वर्चस्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here