श्री. लक्षेश्वर संस्थान सेवाधा-यांनी ५ हजार भाविकांना पोहचविला घरपोच महाप्रसाद…

सेवाधा-यांनच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

लाखपुरी :- १५ , मुर्तिजापुर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री. लक्षेश्वर संस्थांना लाखपुरी तालुका मूर्तिजापुर जिल्हा अकोला येथे दरवर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असेत परंतु यावर्षी अकोला जिल्ह्यात कोरोणाचा प्रभाव पाहता प्रशासन व देवस्थान समितीने ही यात्रा रद्द केली होती.

भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने तीन दिवस संचारबंदी लागू केली होती.महाशिवरात्री उत्सव परंपरा खंडित होऊ नये व जमावबंदीचा आदेश पाळला जावा याकरिता लक्षेश्वर संस्थानचे सर्व पदाधिकारी व समस्त सेवाधारी यांनी सुंदर नियोजन केले होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी विधीवत भगवान श्री. लक्षेश्वराचा अभिषेक व पूजन करून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी श्री भव्य मिरवणूक रद्द करून पालखीचे मंदिराला पदकक्षणा मारण्यात आली आणि दरवर्षी महाप्रसाद ची वाट पाहणाऱ्या भाविकांना याही वर्षी महाप्रसाद मिळावा

यासाठी सेवाधा-यांनी रात्रभर जागून पुरी , भाजी , बुदीचे १००० हजार परिवाचे पाकीट तयार करुन लाखपुरीतील ७०० घर व महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात महाप्रसादात योगदान देणारे मुर्तीजापुर व दर्यापूर येथील तीनशे परिवारांना सकाळी ११ वाजेपर्यंत घरपोच महाप्रसाद पोहचविण्यात आले .

संचार बंदी मुळे या वर्षी महाप्रसाद मिळणार नाही असे गृहीत धरणार्‍या भाविकांना वेळेच्या आत घरपोच महाप्रसाद मिळाल्यामुळे सुखद आनंद मिळाला या उपक्रमासाठी भाविकांनी लक्ष्मेश्वर संस्थानच्या सर्व सेवाधा-यानचे मनापासून कौतुक केले . कोरोणामुळे गर्दी होऊ नये

व परंपरा सुद्धा टिकावी यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या प्रशासन व मुर्तीजापुर दर्यापूर येथील पत्रकार बंधु मूर्तिजापूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत लाखपुरी यांचे श्री. लक्षेश्वर संस्थानच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here