‘या’ पदांसाठी MPSC कडून परीक्षेची तारीख जाहीर…डाउनलोड करा संपूर्ण तपशील…

फोटो सौजन्य गुगल

राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील एकूण 161 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) येत्या 21 ऑगस्ट रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल.

ही पदे भरणार

1) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेख सेवा (एकूण 9 पदे) 2) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद (एकूण 22 पदे) 3) बाल विकास प्रकल्प अधिकारी व तत्सम पदे (एकूण 28 पदे) 4) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (एकूण 2 पदे) 5) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (एकूण 3 पदे) 6) कक्ष अधिकारी (एकूण 5 पदे) 7) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एकूण 4 पदे) 8) निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे (एकूण 88 पदे)

मुख्य परीक्षा 21 ते 23 जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता

पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा 21, 22 व 23 जानेवारी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

1 जूनपर्यंत करता येणार अर्ज

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 1 जून 2022 पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ओपन गटासाठी 544 रुपये तर मागासवर्गीय गटासाठी 344 रुपये शुल्क आहे. तसेच, अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. नंतर जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करता येणार नाही, असे राज्य लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. अर्ज सादर केल्यानंतर परीक्षेच्या साधारण सात दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथ क्लिक करून तपशील डाउनलोड करा….

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here