आपल्याच पक्षाच्या आयटी सेल प्रमुखांवर खा.सुब्रह्मण्यम स्वामी यांचा सोशलवर प्रहार…

न्यूज डेस्क -भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज ट्विटर च्या माध्यमातून आपल्याच पक्षाच्या आयटी सेल प्रमुखांवर त्यांनी ताशेरे ओढत ट्विट केले आहे. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी फेक सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आपल्याविरुद्ध मोहीम सुरु केल्याचा आरोप सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलाय.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कोणत्या विरोधी मोहिमेबद्दल बोलत आहेत? याची माहिती देणं मात्र त्यांनी टाळलंय.’भाजपच्या आयटी सेलनं ताळतंत्र सोडलंय. आयटी सेलचे काही सदस्या माझ्यावर खासगी हल्ले करण्यासाठी फेक आयडी ट्विटसचा वापर करत आहेत’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

याचा विरोध म्हणून माझ्या नाराज समर्थकांना खासगी हल्ले सुरू केले तर त्यासाठी मला जबाबदार धरता येणार नाही…अगदी तसंच जसं भाजपला बेकार आयटी सेलसाठी जबाबदार धरता येत नाही’ असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.काही युझर्सला उत्तर देताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्यावर निशाणा साधलाय.

‘मी त्यांना टाळतोय परंतु, जे पी नड्डा यांनी मालवीय यांना त्वरीत आयटी सेल प्रमुख पदावरून हटवायला हवं’ असंही त्यांनी म्हटलंय. ‘एक मालवीय कॅरेक्टरच हे सगळं घाणेरडं राजकारण करत आहे. आपण मर्यादा पुरुषोत्तम रामाचा पक्ष आहोत, रावण किंवा दुशासनाचा नाहीत’ असं म्हणत स्वामी यांनी उपरोधिकपणे आपल्याच पक्षावर ताशेरे ओढलेत.

या अगोदर काँग्रेसनंही अनेकदा अमित मालवीय यांच्यावर चुकीचे आणि भावना भडकावणारे कॅम्पेन चालवण्याचे आरोप केले आहेत. परंतु, यावेळी पहिल्यांदाच अमित मालवीय यांच्यावर पक्षातूनच टीका समोर आलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here