खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर…

न्यूज डेस्क – काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांची प्रकृती खालावत चालल्याने पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी सकाळपासूनच चिंता व्यक्त केली जात असताना राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

राजीव सातव यांच्यावर कोरोना आजाराचे उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली. राजीव सातव यांना जहांगीर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून सातव यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली.

यावेळी विश्वजीत कदम म्हणाले की, “राजीव सातव यांना १९ एप्रिलला करोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २१ एप्रिलला तपासणी केल्यावर, त्यांना कोरोना आजार झाल्याचे २२ एप्रिलला आलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. या आजारावर उपचार घेण्यासाठी ते पुण्यातील जहांगीर रूग्णालयात २३ एप्रिलला दाखल झाले.

त्यांची प्रकृती २३ ते २५ तारखेच्या दरम्यान उत्तम होती. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर आणि अन्य इंजेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडल्याने कालपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here