पालघर – विनायक पवार
माझे कुटुंब माझी जबाबदारी’, घरातून बाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर निघावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला वेळोवेळी करत असून जनता ही या आवाहनाला सकारत्मक प्रतिसाद देत आहे. मात्र पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मास्कचा वापर करा, सॅनिटायझर चा वापर करा अशी आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून राज्यातील जनतेला आहवान करत आहेत सद्या पालघर जिल्यामध्ये 50 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आदेश असताना देखील शिवसेना खासदार राजेंद्र गावित हे मुख्यमंत्री व जिल्याधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करताना दिसून येत आहेत.
मुरबे येथील एका विकास कामाची पाहणी करताना खासदार यांच्या स्वताच्या तोंडावर मास्क नसल्याचा प्रकार समोर आला असून त्यातच खासदार यांच्या भोवती शेकडो कार्यकर्त्यांचा मोठा गराडा त्याच्या शेजारी पाहायला मिळाला.
त्यामुळे सामान्य नागरीकांना वेगळा न्याय आणि खासदारांना वेगळा न्याय का असा सवाल सध्या पालघर जिल्हा वाशिय करत असून ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी जिल्यातील सामान्य नागरिकांच्या वर्ती कोरोना नियमाचे उल्लंघन करत आसल्याने कारवाई करण्यात येत आहे तर आता खासदारांनी नियमाचे उल्लंघन केली म्हणून खासदारांच्या वर्ती जिल्हाधिकारी कारवाई करणार का याकडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.