Home Breaking News in Marathi

वाशिममध्ये खासदार आणि आमदाराची एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल…नेमका वाद कशावरून ?…जाणून घ्या

न्यूज डेस्क – काल वाशिममध्ये खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे नियोजन भवनात भावना गवळी आणि राजेंद्र पाटणी यांच्या कार्यकर्त्याने राडा केल्यानंतर वाशीम शहरात भावना गवळी यांचा निषेध केल्या गेला. या प्रकरणी खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाशिम इथं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्याअगोदर खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये गुंठेवारी शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू होती. नेमकं त्याचवेळी आमदार राजेंद्र पाटणी तिथे आले होते.

त्यावेळी राजेंद्र पाटणी आणि भावना गवळी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलिसात खासदार भावना गवळी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

त्यानंतर शहरातील आमदार समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी पाटणी चौकात खासदार भावना गवळी यांचे पोस्टर आणि टायर जाळून निषेध केला. त्याच दरम्यान खासदार समर्थक शिवसैनिक ही घटनास्थळी आले आणि दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तर दुसरीकडे, ‘मी गुंठेवारी सुरू होऊ देणार नाही आणि मी महिला असतांना त्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, त्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध तक्रार करीत आहे’ असं भावना गवळी यांनी सांगितलं. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आमदार आणि खासदारांनी एकाच दिवशी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.

सद्यस्थितीत शहरातील वातावरण निवळले असून शांतता आहे. राजकीय वादामुळे शहरासह जिल्ह्यात एकच चर्चा रंगली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!