राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा कचेरीवर आंदोलन..!

अकोला – गोकुळ हिंगणकर

आज देशभरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने निदर्शन करण्यात आले. कारण 1994 पासून मिळत असलेले ओबीसी संवर्गाचे 27% टक्के राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे धोक्यात आले आहे.

याकरिता राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केलेली आहे व यातून काही दिवसात माहिती गोळा होईल व या माहिती मधून कोणत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायत मध्ये किती आरक्षण द्यायचे याचा तक्ता देखील तयार होईल पण एक गोष्ट नक्की आहे की हा तक्ता तयार होताना ओबीसी संवर्गात आतापर्यंत मिळत असलेले 27% राजकीय आरक्षण नक्कीच मिळणार नाही.

ओबीसींना यापुढे कुठे 15%, 18%, 20%, 22% व 25% अशा प्रमाणात आरक्षण राहणार आहे कारण 50% आरक्षणातून एससी व एसटी या दोन प्रवर्गातील लोकसंख्येच्या आधारावर त्यांना आरक्षण दिल्यानंतर उरलेले आरक्षण ओबीसींना दिल्या जाईल व हे नक्कीच 27% टक्के पेक्षा कमी रहाणार आहे. व हा संपूर्ण ओबीसी समाजासाठी फार मोठा धोका आहे. हेच नाही तर काही वर्षानंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण शून्यावर सुद्धा जाऊ शकते.

वरील सर्व संभाव्य धोके लक्षात घेता ओबीसी समाजाच्या भविष्यासाठी आता राज्य सरकार अपेक्षा केंद्र सरकारची भूमिका जास्त महत्त्वाची आहे.यामध्ये केंद्र सरकारने होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातिनिहाय जनगणना करावी., भारतीय संविधानाच्या 243 (D) 6 आणि संविधानाच्या कलम 243 (T) 6 मध्ये मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये ओबीसी स्वर्गाला 27% राजकीय आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात यावी.

तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची घटनेमध्ये तरतूद किंवा सुधारणा करून संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यावा. अशा आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नरेंद्र लखाडे, ओबीसी नेते विजयराव कौसल, युवाध्यक्ष माणिकराव शेळके, राजेश गावंडे, सुभाष दातकर, मनोहरराव शेळके,

प्रा. विवेक गावडे, प्रमोद धर्माळे, अनिल शिंदे, गजानन वाघोडे, अनिल गावंडे, समाधान महल्ले, महिलाध्यक्ष वर्षा पिसोडे, शुभांगी किनगे, सुनीता श्रीवास, नम्रता धर्माळे, रंजना हरणे, माधुरी गिरी, सुवर्णा गोंड, घनमोडे साहेब, आखरे साहेब, वखरे साहेब, प्रा.सदाशिव शेळके, हरिभाऊ ठाकरे, गणेश पासूळकर, बाळकृष्ण दांदळे, शिवदास गोंड, मनीष रुल्हे, विजय भोरे, दिलीप पुसदकर पीयूष तिरुख आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here