मोटार सायलकची डीवाईडरला धडक – १ मृतक तर १ गंभीर जखमी… पवनी गावाजवळ घडली घटना…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पवनी येथे मोटार सायकलची डीवाईडर ला धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून मृतकाचे नाव राजकुमार हरलाल मरस्कोल्हे(२२)राहणार ध्रुकधामणा वाडी,नागपूर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार राजकुमार मरस्कोल्हे हा आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच-४०/बी पी-६४७२ ने मध्यप्रदेश येथील कल्याणपुर येथे मित्राच्या वडीलाच्या तेरवीच्या कार्यक्रमाला गेला होता.

तो कार्यक्रम आटोपून राजकुमार हा आपला मित्र नितेश कुमार रामदयाल रहांगडाले सोबत डबल सीट मोटार सायकलने नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ ने परत येत असतांना पवनी गावाजवळ आल्यावर रात्रीची वेळ असल्याने राजकुमार चे मोटारसायकल वरील नियंत्रण सुटून मोटर सायकल डीवाईडरला धडकली.हा अपघात रात्री २०वाजताच्या सुमारास घडला.

याभीषण अपघातात राजकुमार हरलाल मरस्कोल्हे(२२)राहणार नागपूर याचा मृत्यू झाला तर नितेशकुमार रामदयाल रहांगडाले(१८) राहणार कल्याणपूर मध्यप्रदेश हा गंभीर जखमी झाला.हा अपघात गावाजवळ झाल्याने गावकरी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती देवलापार पोलिसांना देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमी नितेेशकुमारला तात्काळ ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे दाखल केले.डॉक्टरांनी त्याचेवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here