आई व मुलीचा विहिरीत पाय घसरून मृत्यू…नांदेड जिल्ह्यातील घटना…

महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील जिरोणा येथील आई व मुलीचा स्वताच्या शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली आहे. सदर दोघी आई व मुलीचे मृतदेह विहिरीच्या तळाला गेल्याने गावक-यांनी उशिरा  विहिरीच्या बाहेर काढुन शेतातच विहिरीच्या बाजुला अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती सरपंच पती दताञय तुपसाखरे यांनी दिली आहे.

उमरी तालुक्यातील जिरोणा ग्राम पंचायत समितीचे सेवक साहेबराव चुनूकवाड यांची पत्नी सौ.सुनंदा साहेबराव चुनूकवाड वय ४० वर्षे ग्राम पंचायत समिती सदस्या,तसेच मुलगी कु.कविता साहेबराव चुनूकवाड वय २० वर्षे आधी मायलेकी स्वंताच्या शेतात काम करीत होते.

अचानक विहिरी जवळ गाय गेली ती गाय विहिरीत पडेल म्हणून कु.कविता चुनूकवाड हिने धावत गाईला वाचवण्यासाठी गेली असता अचानक गवतावरुन पाय घसरून तीचा तोल विहिरीत गेला हे उघड्या डोळ्यांनी आई सुनंदा चुनूकवाड हिने पहाताच क्षणाचा विलंब न करता मुलीला वाचवण्यासाठी विहिरीत विहिरीत ऊडी मारुन मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता दोघींना ही पोहता येत नसल्याने दोघेही मायलेकी विहित बुडून मुत्यूमुखी झाल्याची घटना रविवारी अंदाजे चार वाजताच्या सुमारास घडली.

सदर घटना  शेजारील शेतक-यांनी पाहुन जिरोणा गावात येऊन गावात माहिती दिले तेव्हा गावातील नागरिकांनी विहिरीतुन मायलेकीचा मृतदेह बाहेर काढुन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार उशिरा करण्यात आले असल्याचे माहिती डि.जी तुपसाखरे यांनी दिले.जिरोणा गावात शोककळा पसरली आहे. आता साहेबराव चुनूकवाड यांना एक मुलगा योगेश साहेबराव चुनूकवाड हा बारावीचे शिक्षण घेतो तर मुलगी कु.पुजा साहेबराव चुनूकवाड हि बी.ए.चे शिक्षण घेत आहे. आई व बहिणचे निधन झाल्याने मुलगा व्याकुळ झाला असुन त्याला उमरी ग्रामीण रुग्णालयत उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे माहिती संतोष ईगलेवाड यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here