विद्युत तारेच्या स्पर्शाने आई व मुलाचा जागीच मृत्यू…कागल तालुक्यातील बाचणी येथील घटना..सर्वत्र हळहळ…

कागल – राहुल मेस्त्री

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील बाचणी गावामध्ये काळजाचा ठोका हलवणारी घटना घडली आहे ..आई आणि 14 वर्षाचा मुलगा विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यु झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बाचणी तालुका कागल येथील गीता गौतम जाधव वय वर्ष 35 आणि त्यांचा मुलगा हर्षद गौतम जाधव वय वर्ष 14 व मुलगी भक्ती गौतम जाधव हे धुने धुण्यासाठी दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजले असता गावातील व्हनाळी रोडकडे असलेल्या शेंगा नावाचे शेताजवळील नाल्यामध्ये गेले होते.तेथुन ते धुणे धुवुन परत येत असताना येथील सतीश ज्ञानदेव पाटील यांच्या शेतात तुटुन पडलेल्या विद्युत तारेच्या वाहीणीला गिता गौतम जाधव , हर्षद गौतम जाधव यांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही बातमी समजतात करवीर डीवायएसपी आर आर पाटील, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक निखिल करचे व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करण्यात आला. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

ही बातमी समजताच येथील परिसरातील अनेकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.. तर या दुर्दैवी घटनेमुळे बाचणी व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे…तर याला जबाबदार कोण असेही बोलले जात आहे..पुढील तपास कागल पोलीस करत आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here