अकोला बुलढाणा फार्मर प्रोङ्युसर कंपणी ली ची मासीक मिटिंग संपन्न…

अकोला – अमोल साबळे

रविवार दिनांक 30जानेवारी रोजी आकोला बुलङाणा फार्मर प्रोङ्युसर लिमिटेड, या नव्यानेच झालेल्या कंपणीची एक दिवसीय मिटींग भारतीय सेवा मंडळ नागपूर व्दारा संचालीत शेतकरी सेवा प्रकल्प पहुरजिरा येथे संपन्न झाली, आयोजित मीटिंगला कंपणीचे अकराही संचालकाची प्रामुख्याने ऊपस्थीती होती,

कंपणी नुकतीच या जानेवारी महिन्यातच शासकीय नोंदणीक्रुत झाली असुन, अंत्री येथे निंबा फाटा ते आकोला रोङटच दोन एकर जमीन सुद्धा कंपणीच्या नावांनी विकत घेण्याचा सौदा सुद्धा झालेले आहे, यापुढील कंपणीचे मुख्य आणि कार्य कशा प्रकारे राहील, या करीताच सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते ठरविलेल्या प्रमाणे निर्णय घेऊन कंपणीच्या कामाला सुरुवात करावी, हाच एकमेव उद्देश ठेवून सर्व संचालकीय कोअर कमीटीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती,

शेतकरी सेवा प्रकल्प पहुरजिरा येथे सर्व सन्माननीय संचालक मंडळीचे आगमन व स्वागत झाले, सकाळचा नास्ता चहा, आटोपून मीटिंगला सर्व अकराही संचालकाच्या ऊपस्थितीत
आणि कंपणीचे अध्यक्ष मा.दादाभाऊ टोहरे यांचे प्रमुख अध्यतेखाली मीटिंग ला सुदंर अशा वातावरणात सुरूवात झाली,

त्या पुर्वी सन्माननीय संचालक श्री ऊज्वलभाऊ दबङघाव यांचा 30जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने सर्व प्रथम ऊज्वलभाऊ आणि दादाभाऊ यांचे शुभहस्ते प्रकल्पावरील हनुमान मंदिरात मारोतीरायाची पुजाअर्चा करण्यात आली,त्यानंतर सर्व संचालक मंडळीच्या ऊपस्थितीत संतशिरोमणी तुकाराम महाराज यांचे प्रतिमेचे पुजन तथा माल्यार्पन करण्यात आले, तद्नंतर सन्माननीय दबङघाव साहेब यांचे वाढदिवसानिमित्त केक कापून आणि शेतकरी सेवा प्रकल्पाचे संचालक राम आखरे,

क्रुषी संजीवनी सेवा प्रतिष्ठानचे, अध्यक्ष मा.जनार्दन साबळे, आकोला बुलङाणा फार्मर प्रोङ्युसर कंपणी ली, चे अध्यक्ष दादाभाऊ टोहरे, संचालीका मा.सौ. पद्मावती सुरेश कोल्हे, यांचे हस्ते शाल श्रीफळ, पुष्पहार घालून यथोचित सन्मान तथा सत्कार करण्यात आला,त्यानंतर ऊपस्थितीत सर्व संचालकीय कोअर कमीटीने वाढदिवसानिमित्त दबङघाव साहेबांना शब्दसुमनानी भरभरून शुभेच्छा दिल्यात,

त्या नंतर सर्व संचालकीय कोअर कमीटी ने नियोजित मीटिंगला सुरूवात केली, मीटिंग मध्ये कंपणीच्या द्रुष्टीने सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले, आणि सभेत निश्चित केल्या प्रमाणे पुढील कार्याला लवकरच सुरूवात करण्यात येईल, सभेत जे मुद्दे विषय चर्चिल्या गेलेत,

त्यावर संचालकाचे अगदी मनापासून एक वाक्यता व एकमत दिसुन आले, त्यामुळे कंपणी नोंदणी झाल्यानंतर प्रथम मीटिंगमध्ये सर्व संचालकीय कोअर कमीटीने एक प्रकारचे समाधान व्यक्त केले, मीटिंगच्या पहिल्या सत्राचे सुत्रसंचालन कंपणीचे कोषाध्यक्ष राम आखरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक .प्रा.सौ.पद्मावती कोल्हे यांनी केले,

मध्यात्यर मध्ये भोजण आटोपून मीटिंगच्या दुसर्या सत्राला सुरूवात करण्यात आली, दुसर्या सत्रात सुद्धा कंपणीच्या ऊभारण्यासाठी, प्रत्येक कोअर कमीटी संचालक सदस्यांनी शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त आपापले योगदान देण्याचे आश्वासन दिले, काही अत्यंत महत्वाचे कामे करण्यासाठी कंपणीचे काही महत्वपूर्ण (पद) पदाधिकारी यांची सर्व संमतीने निवङ सुद्धा करण्यात आली असुन ती येणे प्रमाणे आहेत,

कंपणी अध्यक्ष, दादाभाऊ टोहरे, सचिव, संजय रोहणकार , कोषाध्यक्ष, राम आखरे, तर (एम.ङी.) कार्यकारी संचालक म्हणून जनार्दनजी साबळे यांची निवङ करण्यात आली, कंपणीसाठी जमीन खरेदी करण्यासाठी लागणार्या निधीसाठी,प्रत्येक संचालक सदस्यांनी आपापल्या कङील आनलेला चेक (धनाकर्ष) कंपणी अध्यक्ष दादाभाऊ टोहरे यांचे कडे जमा केले, अशा प्रकारे दुसर्या सत्राचे अगदी महत्वपूर्ण कामकाज पार पङले,

मीटिंगच्या दुसर्या सत्राचे सुत्रसंचालन जनार्दन साबळे यांनी सांभाळले, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी कंपणी सचिव संजय रोहणकार यांनी पार पाङली,सरते शेवटी सर्व संचालकीय कोअर कमीटीनी कंपणी प्रती आपले प्रामाणिक कर्तव्य, निष्ठा, एकमेकांवरील कायम विश्वास, कामांची जबाबदारी व चिकाटी, हे सर्व कंपणी प्रती सातत्याने एकनिष्ठ राहावे, करीता सर्व संचालकानी आपला ऊजवा हात समोर करून संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचे चरणी साक्ष ठेवून प्रतीद्न्या शपथ सुद्धा घेण्यात आली,

सभेला आदरणीय दादाभाऊ टोहरे, सुरेश मेटांगे, संजय रोहणकार, अनिल गावंडे, राम आखरे, जनार्दन साबळे,प्रा .सौ. पद्मावती कोल्हे, प्रा. उज्वल दबडघाव, अनोख गहले, सुरेश टोहरे व निळकंठ ठाकरे उपस्थित होते. आणि त्या नंतर चहा पाणी घेवून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here