राज्यात मान्सूनचं पुनरागमन…हवामान विभागाची माहिती

न्यूज डेस्क – राज्यात गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवलं, तर अनेक ठिकाणी पेरणी झालीच नसल्याने शेतकरी चिंतेत होता, मात्र कालपासून विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पश्चिम विदर्भात काही ठिकाणी पाउस जोरदार कोसळला असल्याने शेतकरी काही प्रमाणात आनंदित झाला.

तर येत्या 12 जुलैपासून देशासह महाराष्ट्रातही मान्सूनचं पुनरागमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना पेरणी केली आहे तेव्हापासून पावसाने दांडी मारली आहे, जमिनीमध्ये बियाण्याला अंकुर कडक तापमानामुळे जळत आहेत, ज्या शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय आहे,त्यांचेच पिके जिवंत आहेत. मात्र या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

बंगालचा उपसागर आणि ओडिशा, पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे.

कोकण, गोवा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं (IMD) वर्तवला आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.

दरम्यान दुसरीकडे 9 जुलै रोजी सिंधुदुर्ग, 10 जुलै रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर 11 जुलै रोजी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्या वेगवाग वाऱ्यासह विजांचा कडकडाटह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

1 COMMENT

  1. मान्सून आला म्हणत आहेत आमच्या गावाकळे अजूनही पाऊस आला नाही 20 दिवस झाले पेरणी झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here