धनदांडग्यांनी राजकीय नेते व पोलिसांना हाताशी धरून वणई येथील ७० वर्षा पासून कब्जयात असलेली शेतजमीन जबरदस्तीने बळकावली…

पिडीत गरीब आदीवासींना मदत करणार्‍यांवर मात्र खंडणीचे गुन्हे दाखल.

बोईसर प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यात मुंबई,ठाणे आणि वसई अशा शहरातील काही धनदांडग्यानी स्थानिक राजकीय नेते,महसूल अधिकारी,स्थानिक पोलिस आणि भूमाफीयांना हाताशी धरून त्यांच्या मदतीने गरीब आशिक्षीत आदीवासींच्या अनेक वर्षापासून कब्ब्ज्यात असलेल्या जमीनी चा धारा भरून सुधा बळकावण्याचा सपाटा लावला आहे.

यामुळे अनेक आदीवासी कुटुंबे संपूर्ण भूमीहीन होण्याच्या मार्गावर असून त्यांना मदत करणार्‍यावरच उलट स्थानिक पोलिसांकडून खंडणीचे गुन्हे दाखल केले जात असल्याने वणई येथीलपीड़ित शेतकऱ्यांनी प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे.

डहाणू तालुक्यातील गोवणे तलाठी सजातील मौजे वणई येथील सर्वे नं.427/6, 398 ,333 मधील १० एकर जागा गेल्या वाडवडीलां पासून ६० ते ७० वर्षे पासून शालू रविंद्र गडग व इतर ८ आदीवासीं कुटुंबांच्या कब्जेवहीवाटीत आहे.गेली अनेक वर्षे ही आदीवासी कुटुंबे त्या जागेवर शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

मात्र काही दिवसा पासून ठाणे येथील कोंग्रेस पक्षाच्या पादाधिकारी असलेल्या निर्मला कलाल या धनधांडग्या महीलेने पालघरचे खासदार राजेंद्र गावीत आणि महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना हाताशी धरून आदिवासी शेतकऱ्यांच्या 70 वर्षापासून ताब्यात असलेली १० एकर जमीन बळकावली असल्याचा आरोप वनई येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

वाडवडीलां पासून कसत असलेली जागा बळकवण्यात आल्याने वणई येथील ही १० आदीवासी कुटुंबे भूमीहीन होण्याच्या मार्गावर आहेत.आदीवासींची ही जमीन धनदांडग्या भूमाफीयांच्या घशात जाऊ नये म्हणून त्यांना मदत करणार्‍या १५ व्यक्तींवर खासदार गावीत यांच्या राजकीय दबावाने स्थानिक पोलिसांनी चक्क खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचे पिडीत आदीवासी शेतकरी महिलेने सांगितले आहे.

बाहेरून पालघर जिल्ह्यात आलेल्या उपर्‍यांनी राजकारण आणि समाजकारणाच्या खोटा बुरख्याखाली इथल्या मूळ आदीवासींच्या जमीनी हडपण्याचा सपाटा लावला आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्ग,मनोर-पालघर रोड,चिल्हार-बोईसर रोडलगतच्या गरीब आशिक्षीत आदीवासींना फसवून आमिष दाखवत,

जबरदस्तीने धाकटदपश्याने बहुमोल किमतीच्या त्यांच्या जमिनी कवडीमोल दराने शहारातील धनदांडग्यांच्या घशात घालत असून यामुळे पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य आदीवासी संपूर्ण भूमीहीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वणई येथील आमची वडीलोपार्जित कबजातील जमीन निर्मला कलाल ,खा.राजेंद्र गावीत यांनी पोलिस यंत्रणेच्या मदतीने जबरीने जागा खाली करत असून.ही जमीन वर्षानुवर्षे आमच्या कब्ज्यात असून याच्या धारा पावत्या देखील आमच्याकडे आहेत.याविरोधात तक्रार केली असता उलट पोलिसांनी आम्हाला मदत करणाऱ्यावरच खोटे खंडनीचे गुन्हे दाखल करून अन्याय केला आहे.

शालू रविंद्र गडग
पीड़ित शेतकरी महिला
वणई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here