आधुनिक सावित्रींनी स्मशानभुमीत वृक्षारोपण करून साजरी केली वटपौर्णिमा…

रामटेक – राजु कापसे

पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे मानवापुढे शुद्ध हवेचे संकट आ वासुन उभे आहे. कोरोना काळात अनेकांना आँक्सिजन वाचुन जिव गमवावा लागला.यापासुन प्रेरणा घेऊन आज वटपौर्णिमे निमित्त रामटेक सृष्टी सौंदर्य परिवार मधील महिलांच्या हस्ते स्मशानभुमी, अंबाळा येथे दहा वटवृक्ष आणि चिंच,जांभूळ, आवळा, आंबा, रॉयल पाम इत्यादी प्रकारच्या २३ झाडांचे वृक्षरोपण कले.

विश्वविक्रम कर्त्या डॉ. सौ. अंशुजा किमंतकर यांच्या नेतृत्वाखाली सौ.गौरी सावंत, सौ.सुचिता मोकदम,सौ.निशा बाकडे, सौ.माधुरी शेळके, डॉ.सौ.मंजुषा सेलोकर,डॉ. सौ.अश्विनी बरबटे, सर्वज्ञा मोकदम,लेशिका बाकडे,राजन्या किमंतकर,सृष्टी सावंत आदी महिलांनी सकाळी ६ ते ८ च्या दरम्यान स्मशान भूमी, अंबाळा रामटेक जि.नागपुर येथे वृक्षारोपण केले. महिलां सोबतच लहानमुले आणि सृष्टी सौंदर्य परिवारातील तरुणांनी वृक्षारोपण केले.

वृक्षारोपणा सोबतच झाडांच्या संगोपनासाठी कठडे सुद्धा लावले. आज पासुन पुढील सहा दिवस शंभरावर झाडे लावण्यात येणार आहेत.आपल्या प्राचीन प्रथा परंपरां सोबत पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, अंधश्रद्धेला खतपाणी न घालता त्यातील वैज्ञानिक तथ्य लक्षात घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here