अकोला पोलीस दलातर्फे दहशतवादी हल्ल्याची नाटयमय कार्यवाही…

अकोला – आज दिनांक २७.०८.२०२० रोजी अकोला जिल्हयात भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्या अनुषंगाने कोणकोणत्या उपायायोजना व कार्यवाही करण्यात येईल त्या कार्यवाहीबाबत अकोला जिल्हा पोलीस अ वर्गवारी असलेले मर्मस्थळ आकाशवाणी केंद्र अकोला येथे नाटयमय रंगीत तालीमीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरच्या नाटयमय कार्यवाहीत पाच दहशतवादयांनी आकाशवाणी केंद्र कार्यालयावर हल्ला करून त्यांच्या मागण्यांकरीता एका अधिकाऱ्यास ओलीस ठेवले होते. याबाबत पोलीस दलास माहिती प्राप्त झाल्यावर पोलीस दलाकडुन तातडीने घटनास्थळावर असलेल्या पोलीस स्टेशन सिव्हील लाईन येथे बेस कॅम्प तयार करुन त्याठिकाणी
पोलीसांची कमांडो टिम क्युआरटीस पाचारण करण्यात आले.

त्यानंतर अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला, शहरातील सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाप, पो.नि. जिवीशा, पोनि.स्थागुशा, पो.नि. आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवाध विरोधी पथक, दहशतवाद विरोधी कक्ष, राखीव पोलीस निरीक्षक,बीडीडीएस , आयकार युनिट, मोटर परिवहन विभाग, बिनतारी विभाग,आरसीपी प्लाटुन, अॅम्बुलन्स, फायरब्रिगेड,वाटाघाटी करणारा गट, इत्यादी यंत्रणेला त्वरीत कार्यान्चीत करुन बेस कॅम्प पो.स्टे. सिव्हील लाईन या ठिकाणी
पाचारण करण्यात आले.

त्यानंतर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच ओलीस ठेवण्यात आलेल्या अधिकाऱ्याची सुटका करण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक सा. अकोला यांनी रणनीती ठखुन कमांडो क्युआरटी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने क्युआरटी पथकाने आपली कामगिरी चोख बजावुन ओलीस ठेवलेल्या अधिकाऱ्याची सुटका करुन पाच दहशतवादयांना कंठस्नान केले.

अशा प्रकारे भविष्यात अकोला जिल्हयात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याअनुषंगाने करण्यात येणार आहे.सदरची रंगीत तालीम ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री जी. श्रीधर अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक सा.श्री प्रशांत वाधुंडे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here