अकोला – अमोल साबळे
सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेल्या जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे. एक मिनिटही कॉल चालत नाही, सातत्याने कॉलड्रॉप होतात, त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
निंबा फाटा, नया अंदुरा, कारंजा रमजानपुर, हाता,बहादुर, निंबा परिसरात मोबाईलच्या एकूण ग्राहकांपैकी 90 टक्के ग्राहक आता जिओ झाल्याने ग्राहकसंख्या वाढली आहे.
परंतु त्या तुलनेत टॉवर वाढविले गेलेले नाही. ग्राहक जास्त व टॉवर कमी असा असमतोल निर्माण झाल्याने नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील मुख्यालयीच नेटवर्कची सर्वाधिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एकतर कॉल लागत नाही, लागला तर मधातच कट होतो, त्यामुळे पूर्ण बोलणे होत नाही, समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होतो, दोन ग्राहक समोरासमोर उभे असूनही त्यांचा एकमेकांना फोन लागत नाही आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. सातत्याने केवळ जिओ कॉलड्रॉप होत असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरावर नेटवर्कसाठी जिओ टॉवर लावलेले आहेत.
त्यातील काहींनी ते आॅफ केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे ग्राहकांना घरात तर दूर रस्त्यावर आणि उंचावर असूनसुद्धा नेटवर्क मिळत नाही. नेटवर्कअभावी तंत्रज्ञानाच्या कामात खोळंबा होतो आहे.सर्वीस सेंटरमध्ये ग्राहक तक्रारीसाठी गेल्यास तेथे योग्य न्याय मिळत नाही. किमान कुणी तक्रार ऐकूनही घेत नाही. जिओ सक्षम आॅथिरिटी येथे उपलब्ध नसल्याने तक्रार नेमकी कुणाकडे करावी, असा प्रश्न ग्राहकांपुढे निर्माण होतो.
जिओ या नेटवर्कबाबत चौकशी केली असता, आमच्याकडे तक्रारी येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. कॉलड्रॉपच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या कित्येक जिओ ग्राहकांनी आता ही कंपनी सोडून आपला क्रमांक दुसऱ्या चांगले नेटवर्क असलेल्या मोबाईल कंपनीत कन्व्हर्ट करून घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे लगतच्या भविष्यात जिओ ग्राहक संख्या अर्ध्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.