बिलोली – रत्नाकर जाधव
महाराष्ट्र निवनिर्माण सेनेची तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे यांनी दिली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बिलोली तालुक्याची कार्यकारणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व जिल्हाध्यक्ष माॅटीसिंघ जहागिरदार यांच्या आदेशानुसार पक्ष कार्यात सातत्य नसल्यामुळे बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे यांनी दिली आहे.
परंतु तालुक्यातील कुंडलवाडी येथील मनसेची कार्यकारणी जैसे थे ठेवल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. येत्या ८ दिवसामध्ये तालुक्यातील कार्यकर्त्याचे मत जाणुन घेऊन नविन कार्यकारीणी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.