सरकारच्या वाढीवविजबिल विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…

सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चामध्ये रोष…

यवतमाळ – सचिन येवले

कोरोना काळात अत्यंत वाईट परिस्थतीत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या आणि वाढीव वीजबिल देऊन आपला शब्द फिरवणाऱ्या या शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने आज स्थानिक टिळक स्मारक येथून धडक मोर्चा चे आयोजन राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ येम्बडवार, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.

कोरोना काळात अनेक लोकांचे रोजगार गेले अनेक उद्योगधंदे बंद पडले अश्या परिस्थिती हे वाढीवविजबिल भरायचे कुठून असा सवाल सर्व सामान्य नागरिक विचारत आहे.अगोदर शासनाने या विजबिलाचा विचार करण्यात येऊन सर्वसामान्य जनतेतेला दिलासा देण्यात येईल असा शब्द दिला आणि आता त्याहून फिरत हे बिल भरावेच लागेल असा फतवा काढला.मनसेचा हा मोर्चा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर होता.

मोर्चामध्ये जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांसोबतच सामान्य नागरिक महिलांनी सुद्धा सहभाग नोंदविला.सरकार च्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात आपला निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फीत लावुन निषेध व्यक्त केला. या वेळी शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी मोर्च्या दरम्यान करण्यात आली.शहरातून मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकला.

या प्रसंगी मनसेचे शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष आनंद येम्बड वार यांनी लॉक डाऊन काळात जनता त्रस्त असून विज महामंडळाने अवास्तव बिल देऊन जनतेचे कंबरडे मोडले असुन शासनाने तात्काळ विजबिलमाफी देत जनतेला दिलासा द्यावा जनतेच्या भावना तीव्र असुन याचा उद्रेक होऊ शकतो,

असा इशारा देत सरकारने जर निर्णय न घेतल्यास आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला तसेच अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी विजमहामंडळाने विजतोडणी चे आदेश त्वरित रद्द करावे अन्यथा मनसेच्या पद्धतीने समाचार घेण्यात येईल असा इशारा या प्रसंगी दिला.

मनसेच्या या शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ येम्बडवार,जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, अभय गडम, सादिक शेख, अमित बदनोरे, डेविड शहाणे, विकास पवार,नगरसेवक गजु भालेकर, धनंजय त्र्यंबके, यांचा समावेश होता.या मोर्च्यात प्रामुख्याने महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता घोडमारे, बाळू कठाळे, संतोष रोंगे, सुनील चव्हाण, सचिन येलगंधेवार,

अक्षय देशमुख,संदीप लांडे, हेमंत खंगार, सुधाकर झोटिंग,प्रदीप तडसकर,तृषाल गबराणी,,मयूर जुमळे,गोपाळ चव्हाण,नंदू नेहारे,बबलू मसराम, मयूर मेश्राम,परीक्षित राणे,मनोज झोपटे, दिपक आडे,सुनील तायडे,विलास बट्टावार,पराग बारले, शेख तौसिफ,विनोद दोंदल यासह मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here