मनसे पोहचली शेतकऱ्यांच्या बांधावर…राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने…

३०१ आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत वाटप…

सचिन येवले ,यवतमाळ
यवतमाळ जिल्हा हा आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून दुर्दैवाने नावारूपास आला आहे.अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब आणि पेरणी व बी बियाणे ची

परिस्थिती नसणाऱ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बी बियाणे ची मदत करत असते.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन मनसेचे देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप केले.


यवतमाळ जिल्ह्यात लॉक डाउनमुळे अनेक रोजगार डबघाईस आले आहेत.त्यात शेतकऱ्यांची परिस्थिती तर अत्यंत वाईट अशी आहे.त्यात सरकार ने शेतकऱ्यांचा माल खरेदीची केलेली दिरंगाई आणि उदासीन धोरणांनमुळे पुरता हवालदिल झाला आहे.अश्या परिस्थितीत पेरणी करायची कशी हा मोठा प्रश्न शेतकरी कुटुंबांपुढे उभा ठाकला आहे.शासनाने घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या बांधावर बी बियाणे उपलब्ध झालेच नाही.

या सर्व प्रश्नांवर जिल्हा मनसेने गेल्या काही वर्षांपासून अश्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी बी बियाणांची मदत करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमा अंतर्गत या वर्षी आतापर्यंत ३०१ आत्महत्या ग्रस्त कुटूंब आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना बी बियाणांचे वाटप थेट त्यांच्या बांधावर जाऊन करण्यात आहे.

सोबतच ज्या शेतकऱ्यांची पेरणी करण्याची पण परिस्थिती नव्हती अश्या शेतकऱ्यांना पेरणी साठी बैल जोडी व ट्रॅक्टर मनसेने उपलब्ध करून दिले.या प्रसंगी बोलतांना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी शेतकऱ्यांनी कदापि खचून न जाता मनसे सदैव त्यांच्या पाठीशी असून सरकारच्या उदासीन धोरणाविरोधात मनसे सदैव शेतकरी हितासाठी आक्रमक राहील अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी मनसे ने फवारणीत मृत्यु मुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून मनसेने कृषी विभागात केलेल्या तोडफोडीसाठी मनसेचे आभार व्यक्त करत शेतऱ्यांसाठी आपली दिवाळी अंधारात साजरी करणाऱ्या मनसेचे देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी सर्व शेतकऱ्यांनी मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

अनेक शेतकरी कुटुंबांनी मागील वर्षी मनसेने वाटप केलेल्या बी बियाणांमुळे आम्हाला चांगले पीक झाले यासाठी पण आभार व्यक्त केले.मनसेच्या या अभियानात प्रामुख्याने मनसेचे देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे , सादिक शेख व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here