मनसे चा दणका…

अहमदपूर – बालाजी तोरणे

लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू! लातूर नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे,वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत परंतु राज्यमार्ग प्राधिकरण ने तर अगोदरच या रस्त्याचे दहा करोड अश्या गुत्तेदाराला दिले होते जो रुपये घेऊन गायब झाला होता.

लोकप्रतिनिधी सह प्रशासन सुद्धा या परिस्थितीत हतबल झाले होते.अश्यावेळी मनसेचे डॅशिंग व सतत जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर लढणारे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मैदानात उतरले.

निष्क्रिय राज्यमार्ग प्राधिकरण ला सतत दीड महिने आंदोलनांचा रेटा लावला! शेवटी अतिशय आक्रमकपणे कशाचीही तमा न बाळगता जनतेसाठी प्राधिकरणाच्या अभियंत्याला खड्यात बसवताच हा झोपलेला विभाग जागे झाला व रस्त्याचे काम चालू झाले.

या रस्त्यासाठी डॉ भिकाणे यांनी अहमदपूर येथे खड्यांची पूजा,अष्टामोड येथे रास्तारोको, चाकूर तहसीलमध्ये उपजिल्हाधिकारी व डॉ शिवानांद बिडवे,तहसीलदार चाकूर,जैवन्त चौहान, पोलीस निरीक्षक चाकूर तसेच अहमदपूर तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठकीत ही प्राधिकरण अभियंत्याना खडसावून जाब विचारत लेखी हमी घेणे,

चापोली येथे महामार्गावर तब्बल एक तास झोपा काढो आंदोलन करने, अभियंत्याला खड्यात बसवणे आदी अनेक आंदोलने केली व प्राधिकरण ला शेवटी डॉ भिकाणे यांच्या या मनसे रेट्या समोर काम चालूच करावे लागले.

[काम पूर्ण होईपर्यंत गप्प बसणार नाही..डॉ भिकाणे रस्त्याचे काम मनसेमुळे चालू जरी झाले असले तरी काम पूर्ण होईपर्यंत गप्प बसणार नाही व सतत काम चालू आहे की नाही याची माहिती ठेवणार अशी प्रतिक्रिया डॉ भिकाणे यांनी दिली].

मनसेचे तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे,कृष्णा जाधव,चाकूर तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी,चाकूर कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,तुलसीदास माने आदीसह शेकडो कार्यकर्ते रस्त्याच्या आंदोलनां मध्ये सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here